फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये पुन्हा महिलाराज—
फोंडाघाट सरपंचपद शिंदे गटाकडे,तर उपसरपंच पदी भाजपा सदस्य विराजमान होणार !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी— संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या संवेदनशील फोंडाघाटच्या विकासासाठी, मी सदैव प्रयत्नशील राहीन. युतीमधून निवडून आल्यावर सुद्धा प्रसंगी, पक्षाभिनिवेष बाजूला ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. त्यासाठी गावातील बुजुर्ग मंडळींसह, युवा- युवतींचे सहकार्य घेतले जाईल.आणि गावाच्या समस्यांचे निवारण केले जाईल, असे आश्वासक आवाहन फोंडाघाट गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ संजना आग्रे यांनी केले, आणि सर्व फोंडावासियांना काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. माजी सरपंच संतोष आग्रे यांनी नूतन सरपंच यांना सरपंच पदाच्या आसनावर विराजमान करून,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि कारकीर्दी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, संदेश पटेल, सुभाष सावंत,सुभाष मर्ये, सुंदर पारकर,ठाकूर गुरुजी, रंजन चिके,सौ. सुजाता हळदीवे,सुरेश सामंत,आनंद मर्ये,मोहन पाताडे, बबन हळदिवे,विश्वनाथ जाधव, नवनिर्वाचित सर्व ग्रा.पं.सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या छोटेखानी शुभेच्छापर सोहळ्याचे स्वागत ग्राम विस्तार अधिकारी विलास कोलते यांनी तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राजू पटेल यांनी केले. यावेळी विविध संस्था, ग्रामस्थ, महिला आघाडी, फोंडाघाट पत्रकार संघ यांनी नूतन सरपंच सौ. संजना आग्रे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. माजी सरपंच संतोष आगरे ठाकूर गुरुजी मोहन पाताडे,रंजन चिके, राजन चीके, संतोष टक्के यांनी आपल्या मनोगतातून फोंडाघाट गावापुढील आव्हाने, समस्या आणि त्यावर तातडीने उपाय योजनेची गरज बोलून दाखविली. आणि त्यासाठी गावच्या सहकार्याने नूतन कार्यकारिनीस काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये नळपाणीपुरवठा योजनेची थकीत वीज बील बाकी, कर्जबाजारीपणा, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, आणि रस्ता रुंदीकरण, ग्रामदेवता मंदिरासाठी पर्यटन विकास निधी, राजकारण विरहित विकासात्मक बाबींवर ग्रामसभेतून चर्चा, आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांची उपलब्धता, गावातील डावा तीर कालवा,बाजारपेठेचे पुनर्जीवन, इत्यादी बाबींना स्पर्श केला होता. उपसरपंच पद भाजप तर्फे महिला सदस्य तन्वी मोदी यांना मिळाल्याने फोंडा ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा “महिलाराज” येणार हे निश्चित मानले जात आहे…..