भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (आयआयएसटी) ही एक सरकारी अनुदानित संस्था आहे आणि अवकाश विज्ञानाच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी मानले जाणारे विद्यापीठ आहे. विद्यापीठ केरळमधील वलियामाला, नेदुमंगड, तिरुवनंतपुरम येथे आहे. आशियातील हे असे पहिले विद्यापीठ आहे की जे केवळ अंतराळ विज्ञान अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी समर्पित आहे. संस्थेचे उद्घाटन १४ सप्टेंबर २००७ रोजी इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी केले . आयआयएसटी ची स्थापना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ईस्त्रो) ने भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत केली होती. डॉ अब्दुल कलाम, आयआयएसटीचे कुलपती होते. आयआयएसटी मध्ये अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रयोगांवर लक्ष केंद्रित करून नियमित अभियांत्रिकी पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पर्यन्त अभ्यासक्रम राबवले जातात.
चांद्रयान ३ च्या अभूतपूर्व यशानंतर इस्त्रोचे प्रमुख डॉ एस.सोमनाथ आणि सर्व शात्रज्ञ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.अंतराळात यान पाठवणे, चान्द्रयान, एखाद्या ग्रहावर उतरवणे या गोष्टी आपल्या कल्पनेपलीकडील अत्यंत कठीण , गुंतागुंतीच्या आहेत हे आपल्याला एव्हाना माहीत झाले आहे . या मोहिमांमध्ये हजारो इंजिनिअर, शास्त्रज्ञ अहोरात्र झटत असतात. हे सगळे कोणत्या संस्था /कॉलेजमधे शिकून येतात हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
तर यातील फक्त २ टक्केच विद्यार्थी आयआयटी किंवा एनआयटी येथून येतात हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल.
बहुतांशी शास्त्रज्ञ तिरूअनंतपुरम येथे असलेल्या भारतीय अंतराळ विज्ञान आणि संशोधन (आयआयएसटी) या संस्थेमधून येतात .. या कॉलेजची स्थापनाच अंतराळ संशोधन, इस्त्रोसाठी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी झाली आहे.
या क्षेत्रातील विविध शाखांमध्ये बी टेक/एम टेक/पीएचडी. शिक्षणाची सोय येथे आहे.
पदवी मिळाल्यानंतर या मुलांना प्राधान्याने इस्त्रोमध्ये नोकरीवर घेतले जाते .इस्रोकडून पूर्ण तांत्रिक साहाय्य कॉलेजला मिळते.
सरकारी कॉलेज असल्याने अन्य इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा तुलनेने येथे फी कमी आहे. प्रवेश जेईई परीक्षेवर अवलंबून असतो.या संस्थेमध्ये मराठी विद्यार्थी सहसा आढळत नाहीत. दक्षिण भारतात हे कॉलेज सर्वांना परिचित आहे . त्यामुळेच ईस्त्रोत दक्षिण भारतीय जास्त दिसतात .
ज्या शास्त्रज्ञांमुळे भारताला आज जगातील पहिल्या पाच प्रगत देशात स्थान मिळालं, त्या इस्रोच्या शास्त्रज्ञांची नावे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली की हे पहिल्या फळीचे आठही शास्त्रज्ञ दाक्षिणात्य आहेत..
१) एस.सोमनाथ
२) एस.उन्नीकृष्णन् नायर
३) पी.बिरामुथुव्हेल
४)बी.एन.रामाकृष्णन
५) एम् .शंकरन्
६) एस्.मोहनकुमार
७) डॉ.के.कल्पना
८) व्ही.नारायणन
यात या दाक्षिणात्य शास्त्रज्ञांविषयी आदर,कौतुक होते..पण मराठी मुले यात नाहीत ही खंत होती…
या करियरमधील भौतिकशास्त्र व तंत्रज्ञ याचे क्षेत्र विस्तारत असून तरुणांना खुणावते आहे . परंतु आपल्या पुढील पिढीत इस्त्रोच्या मंगलयान वा शुक्र मिशन मध्ये मराठी मुल दिसण्याकरिता त्यांची पावलं “आयआयएसटीच्या ” दिशेने पडली पाहिजेत .
अंतराळ विज्ञान करियर तुमची वाट पाहत आहे .कदाचित मंगळावर मिथेन असू शकते ?
ॲड विलास पाटणे
उपाध्यक्ष
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी













