चिपळूण | प्रतिनिधी : चिपळूण शहारातील मुरादपूर येथे लोकवस्तीत आलेल्या मगरीला वन विभागाने जीवनदान दिले. दि.२८/१२/२०२२ रोजी चिपळूण शहरातील मुरादपूर येथे साई मंदीर परिसरातील लोकवस्तीमध्ये मगर आल्याची माहिती तेथील ग्रामस्थ श्री. मयेकर यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. कळविलेल्या माहितीचे अनुषंगाने सदर मानवी वस्तीत संकटात सापडलेल्या मगरीचे रेस्क्यु करणेसाठी वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळेस सदरची मगरही मुरादपूर साई मंदीर या ठिकाणी होती. तीचे वय अंदाचे ५ वर्षे व लांबी ५.६ फुट एवढी होती. सदरच्या मगरीला चिपळूण वनविभागाने नव्याने विकसीत केलेल्या लोखंडी पिंजऱ्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यात घेण्यात आले. रेस्क्यु केलेल्या मगरीची पशुवैद्यकिय अधिकारी यांजकडून तपासणी करुन ती तंदुरुस्त असल्याचे सागितले व ती सुरक्षित असल्याची खात्री करून घेवुन नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडून देण्यात आले. सदरील कामगीरी दरम्यान मगरीला सुखरुरीत्या रेस्क्यु केलीकामे स्थांनीक नागरीकांनी वन विभागाचे आभार मानले. या बचाव कार्यात श्री. राजाराम शिंदे, वनरक्षक रामपूर व श्री. राहूल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी यांनी त्या मगरीस ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले.
सदरचे बचावकार्य मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, व मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), रत्नागिरी (चिपळूण) श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीमती राजश्री कीर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण, व त्यांचे अधिनस्त श्री. राजाराम शिंदे, वनरक्षक रामपूर व श्री. राहूल गुंठे वनरक्षक कोळकेवाडी यांचे समवेत पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.