विभागस्तर शालेय स्पर्धेत कुडाळ हायस्कुलच्या वेदान्त राणे भालाफेक क्रिडा प्रकारात प्रथम पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

चौके | प्रतिनिधी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य- पुणे अतंर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा अतंर्गत विभागस्तर शालेय क्रिडा स्पर्धा नुकत्याच सातारा याठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत सिंधूदुर्ग,रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली,सातारा या पाच जिल्ह्यातील स्पर्धकामधे १७ वर्षे वयोगटातील भालाफेक या क्रिडाप्रकारात सिधूंदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुल ज्युनिअर काँलेजचा ११ वीतील विद्यार्थी कु.वेदान्त रघुनंदन राणे याने नेत्रदिपक कामगिरी करत ४१.३५ मीटर भाला फेकून प्रथम क्रमांक पटकाविला..वेदान्त यांची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली अहे.त्याचे कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ कुडाळ आणि कुडाळ हायस्कुल ज्युनिअर काँलेज तसेच चौके हायस्कुल व चौके पंचकौशितून अभिनंदन होत आहे..