आरटीओ ऑफिसमधील ‘या’ सेवा मिळणार आता घरबसल्या

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात फेसलेस पध्दतीने सेवा

रत्नागिरी । प्रतिनिधी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे पुढील सेवा जनतेसाठी फेसलेस पध्दतीने
पुरविण्यात येणार आहेत. शिकाऊ अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नुतनीकरण, अनुज्ञप्तीची माहिती, दुय्यम अनुज्ञप्ती,
वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रातील पत्ता बदल, नाहरकत प्रमाणपत्रातील पत्ता बदल, दुय्यम नोंदणी
प्रमाणपत्र, अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल नंबर अद्ययावत करणे, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे
नुतनीकरण, कर्जबोजा उतरविणे, वाहन हस्तांतरण (कर्ज नसलेले), वाहनाची तात्पुरती नोंदणी वरील सेवांचे
अर्ज parivahan.gov.in/vahan / sarathi या संकेतस्थळावर पूर्ण करुन वाहनाचे व अनुज्ञप्तीचे कागदपत्रे
अपलोड करण्यात यावेत. वरील सेवांकरीता फेसलेस पध्दतीने केल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे
येण्याची आवश्यकता नाही, याची सर्व वाहन मालक व अनुज्ञप्तीधारक यांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.