कणकवली : सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन आणि साहित्यिक व सांगीतिक उपक्रम आयोजित करणाऱ्या तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न कै. ग.रा.पाटील (तात्या) संगीत मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या वतीने साहित्य लेखनास प्रेरणा मिळावी म्हणून प्रथम कवितासंग्रह, कथासंग्रह आणि कादंबरी साठी कवी,गझलकार विनायक गणपतराव कुलकर्णी, सांगली पुरस्कृत, स्व.गणपतराव शंकरराव कुलकर्णी ( तात्या ) जवळेकर स्मृती ‘तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार’
आणि प्रतिभा बुक्स, इस्लामपूर यांच्यावतीने ललित लेखसंग्रह / प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी स्व. बाळासाहेब पाटील स्मृती ‘ तिळगंगा – प्रतिभा पुरस्कार ‘ प्रदान करण्यात येणार असून यासाठी १ जानेवारी २०२०ते ३१ डिसेंबर २०२१ या दोन वर्षाच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या कविता, कथा व कादंबरी या साहित्यप्रकारातील साहित्यिकाच्या पहिल्या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तकभेट असे या प्रेरणा पुरस्काराचे स्वरूप असून या लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय व फोटो सह १० जानेवारी २०२३ पर्यंत पाठवाव्यात.मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षणातून या पुरस्काराची निवड करण्यात येणार असून हे पुरस्कार दि २२ जानेवारी २०२३ रोजी पेठ येथे संपन्न होणाऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.पुरस्कारासाठी आलेली सर्व पुस्तके वाचनालयांना भेट म्हणून देण्यात येणार आहेत.