विजयदुर्ग ग्रामपंचायतीवर प्रभारी सरपंच भाजपचाच?

विजयदुर्ग | प्रतिनिधी : विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज होत असून भाजप प्रणित विजयदुर्ग विकास पॅनेलचा उपसरपंच बसणार हे निश्चित आहे. सरपंच पद हे अनुसुचित जमाती महिला असल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे उपसरपंच हाच प्रभारी सरपंच म्हणून कार्यभार सांभाळणार आहे.विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन नंबर प्रभागमधून सेनेचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला. मात्र उर्वरित आठ सदस्यांच्या निवडणुकीत भाजपचे पाच आणि शिंदे गटाचा एक सदस्य निवडून आले. यामध्ये सर्वाधिक मताने शुभा बाळकृष्ण कदम तीन नंबर प्रभागामध्ये विजयी झाली. या प्रभागामध्ये रियाज काझी, प्रभाग दोनमध्ये प्रतिक्षा प्रदिप मिठबावकर आणि दिनेश मधुकर जावकर विजयी झाले. तर प्रभाग एकमध्ये पुर्वा प्रकाश लोंबर आणि शिवसेना शिंदे गटाची वैशाली गोकुळ बांदकर विजयी झाली त्यामुळे आजच्या उपसरपंच निवडणुकीत भाजपचा प्रभारी सरपंच बसणार हे निश्चित आहे.