आज रोजी स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेच्या जाकादेवी व कोकणनगर शाखेमध्ये मिनी एटीएम सेवेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड.दीपकजी पटवर्धन यांचे हस्ते संपन्न झाले. स्वामी स्वरुपानंद पतसंस्था ही नवनविन तांत्रिक सेवा नेहमीच ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देत आली आहे. या अंतर्गत कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड वापरुन संस्थेमध्ये कोणत्याही ग्राहकाला रु.वीस हजार पर्यंतची रक्कम तातडीने उपलब्ध करुन देणारी ही व्यवस्था आजपासून संस्थेच्या जाकादेवी व कोकणनगर शाखेमध्ये सुरु झाली आहे लवकरच ती संस्थेचे पावस शाखेमध्येही उपलब्ध होणार आहे. हया सेवेसाठी कोणतेही सेवा शुल्क लागणार नाही. ग्रामीण भागातील एटीएम मशीन मध्ये कॅश संपणे, कनेक्टीव्हीटी नसणे आदी अडचणींमुळे ग्राहकाना पैसे काढता येत नाहीत अशी कोणतीही अडचण यामध्ये न येता सहजणे ग्राहकाला रक्कम उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये संस्थेचे खातेदार नसलेल्या व्यक्तीलाही पैसे काढता येतील अशी सुविधा पतसंस्थेने जाकादेवी येथे उपलब्ध करुन दिली आहे याचा लाभ जाकादेवी व कोकणनगर परिसरातील ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी जाकादेवी येथील सरपंच श्री.प्रकाशजी खोल्ये, उपसरपंच श्री.कैलासजी खेडेकर, भारतिय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस श्री.उमेशजी कुलकर्णी, संस्थेचे संचालक श्री.प्रसाद जोशी व श्री.अजित रानडे, श्री.विनोद काळे, श्री.प्रतिक देसाई, श्री.रोहीत कोळवणकर, श्री.उदय शितूत यांचे सह मोठयाप्रमाणावर जाकादेवी येथील खातेदार उपस्थित होते. या सर्वांचे संस्थेचे वतीने व्यवस्थापक श्री.मोहन बापट यांनी आभार व्यक्त केले.