‘कमवायला शिका आणि त्यातून शिका’ ; कृषी विद्यापीठ स्टॉलना उत्तम प्रतिसाद

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी : कृषि महाविद्यालय, दापोली येथील विद्यार्थ्यांनी सद्य बाजारस्थिती आणि विक्रीच्या अनुभवासाठी, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या समोर ‘ कमवा आणि शिका’ या संकल्पनेतून २३ डिसेंबर रोजी माननीय विस्तार शिक्षण संचालक ,डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विक्री केंद्राचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबत विपणन व्यवस्थापनाचा अनुभव यावा या दृष्टिकोनातून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, त्यांना ग्राहकांशी बोलण्याचा अनुभव येणे, ग्राहकांचा कल समजून घेणे, या दृष्टिकोनातून हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. डिसेंबरच्या महिन्यात साधारण पाच ते सहा हजार पर्यटक दापोलीला भेट देतात, त्या अनुषंगानेच या उपक्रमाची सुरूवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटक तसेच स्थानिक लोकांनी याला प्रतिसाद दिला, आता पर्यंत साधारण हजार ते दिड हजार ग्राहकांनी या विक्री केंद्रास भेट दिलेली आहे. यापुढे इतर महाविद्यालयांनी देखिल या प्रमाणे सुरूवात केल्यास विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.या केंद्राची संकल्पना डाॅ. महेश कुळकर्णी यांनी मांडली, या नंतर कृषि महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता माननीय डाॅ.बी.जी.देसाई यांनी संकल्पनेला प्रोत्साहन दिले, तर माहीती केंद्र व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर, डॉ. श्रीकांत रिठे, तसेच इतर मान्यवरांचे सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले.