मिस्टर आणि मिस इंद्रधनुचा मानकरी ठरले आदित्य साळुंखे आणि मैथिली सावंत

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : इंद्रधनु महोत्सवात या वर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात येणार्‍या मिस्टर इंद्रधनुसाठी आदित्य साळुंखे तर मिस इंद्रधनुसाठी म्हणून मैथिली सावंत यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या इंद्रधनु महोत्सवात नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बशीर मुर्तूझा, संचालिका सीमा हेगशेट्ये यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

एस.पी. हेगशेट्ये आणि नवनिर्माण कनिष्ठ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रधनु युवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविधारंगी उपक्रम सादर करताना सृजनशील तरुणाईच्या आविष्काराची अनुभूती तरुणाईला पहावयास मिळाली. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी प्रा. सचिन टेकाळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची लोकधारा नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी सादर केली. लावणी, कथ्थक, देशभक्ती, विरह गीत, गरबा, भांगडा, रॅप, टॅप, या नृत्याच्या थिमवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्ये केली. ग्रुप व सोलो अशा दोन प्रकारात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे परिक्षण प्रा. ताराचंद ढोबळे, प्रा. निकिता नलावडे आदींनी केले.

यावर्षीचा मानाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कोणाला मिळतो याची उत्सुकता होती. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना मिस्टर इंद्रधनू आणि मिस इंद्रधनू हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. वरिष्ठ महाविद्यालयात यावर्षी आदित्य साळुंखे आणि मैथिली सावंत हे याचे मानकरी ठरले. कनिष्ठ महाविद्यालयात मोईनुद्दीन मुल्ला आणि श्रद्धा देवघरकर यांची मिस्टर आणि मिस्टर इंद्रधनूसाठी निवड करण्यात आली.