रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
०२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारूती
मंदिर, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत या स्पर्धात्मक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. सहभागी युवा १५ ते २९ वयोगटातील असावा. (युवा वयोगटाची व्याख्या केंद्र शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे राहील.) ०१ जानेवारी 1994 ते 01 जानेवारी 2008 यामधील जन्मतारीख असावी. ज्या बाबीना साथ संगत आवश्यक आहे. त्या कलाकारांना
वयोमर्यादा लागू नाही. सहभागी होणारा युवा हा महाराष्ट्रातील / रत्नागिरी जिल्ह्यातील रहीवासी असावा.
लोकगीत, लोकनृत्य या प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असणे आवश्यक आहे. कॅसेट / रेकार्ड डान्स मान्य केला
जाणार नाही. युवा महोत्सवाच्या दरम्यान येणा-या तक्रारीचे निवारण करण्याकरीता राज्य विभाग व जिल्हा
स्तरावर त्रिसदस्यीय तक्रार समिती नियुक्त करण्यात येईल आणि समितीचा निर्णय अंतिम राहील.
जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींनी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी 31
डिसेंबर, 2022 रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात, वयाच्या व रहिवाशी
दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, एम. आय. डी. सी. मिरजोळे, रत्नागिरी
येथे अथवा ई-मेल द्वारा (ई-मेल- [email protected]) विहीत कालावधीत पाठवावी. अधिक
माहितीसाठी सचिन मांडवकर, क्रीडा मार्गदर्शक मोबाईल क्र. ८४०८८६५८७० यांच्याशी संपर्क करावा, असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.