पर्यटनाला चालना देणारा फेस्टिवल :- जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी

Google search engine
Google search engine

कुडाळ येथे झाले लाईन फेस्टिवलचा शुभारंभ

कुडाळ | प्रतिनिधी : पर्यटनाला चालना देणारा हा लायन्सचा फेस्टिवल आहे या सेवाभावी संस्थेने हा महोत्सव सर्वप्रथम सुरू केले हे निश्चितच कौतूकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या ‘ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’ या महोत्सवाला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर सुरुवात झाली.

सिंधूलायन्स फेस्टिव्हलचा शुभारंभ लायन्सचे प्रांतपाल राजशेखर कापसे  यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सारस्वत को. ऑ. बँक लि. संचालक सुनील सौदागार कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर लायन्स पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तसेच माजी प्रांतपाल अजित फाटक,   लायन्स अध्यक्ष ऍड समीर कुलकर्णी, झोन चेअरमन सागर तेली, श्रीनिवास नाईक, लायन्स संकुल अध्यक्ष  ऍड अमोल सामंत, महोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,  श्रीमती कापसे, आनंद बांदिवडेकर, संजीव प्रभू, काका कुडाळकर, नयन बांदेकर, डॉ श्रुती सामंत, डॉ दीपाली काजरेकर, तेजस्विनी वैद्य, जीवन बांदेकर, अनंत शिंदे, अस्मिता बांदेकर, मेघा सुकी, डॉ चेतना चुबे, जी दत्ताराम, प्रकाश नेरुरकर, स्नेहा नाईक, श्रध्दा खानोलकर, जयंती कुलकर्णी, डॉ अमोघ चुबे, शोभा माने, ऍड शेखर वैद्य, देविका बांदेकर,  लायन्स पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते. या महोत्सवात मान्यवरांनी अनेक स्टॉलबरोबरच जी. डी. आर्ट पदवी परिक्षेत दिव्यांगामधून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आलेल्या  पूजा रुपाजी धुरी  हिच्या पेटींग स्टॉलची पाहणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला स्नेहा नाईक यांनी केले.