रत्नागिरीत देवर्षी ज्ञातीतर्फे पंचकुंडी पंचायतन स्वाहाकार

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : देवर्षी ज्ञाती मित्रमंडळातर्फे यज्ञकुंड मंडप सिद्धीपूर्वक पंचकुंडी पंचायतन स्वाहाकाराचे आयोजन केले आहे. ७ आणि ८ जानेवारी २०२३ रोजी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बंदररोड येथील देवर्षी नगर येथे केले आहे.मंडळातर्फे ११ वर्षे विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येतात. देवर्षी ज्ञातीबांधव व बंधु भगिनी एकत्र येणे हा उद्देश ठेवून पौष कृष्ण प्रतिपदा व द्वितीया म्हणजे शनिवार दिनांक ०७ व रविवार दिनांक ०८ जानेवारी २०२३ या दिवशी “पंचकुंडी पंचायत स्वाहाकार” करण्याचे योजिले आहे.

शनिवारी ०७ जानेवारीला स. ८.०० ते दु १.०० या वेळेत मुख्यदेवता स्थापना, पुजा, जप, हवन, दु. १.०० ते दु.२.०० भोजन, सायंकाळी ७.०० ते ८.०० आरत्या व मंत्रपुष्प, रात्री ९.०० पासून नाट्यसंगीत मैफिल व सांस्कृतिक कार्यक्रम आणि ज्ञातीबांधवातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.रविवार दिनांक ०८ जानेवारी २०२३ स.८.०० ते दु. १.०० या वेळेत मुख्यदेवता हवन, पूर्णाहुती, आरती व प्रार्थना, दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद, सायंकाळी ७.०० ते ८.०० आरती व मंत्रपुष्प, रात्री . ९.०० पासून सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. ज्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी संपर्क साधावा. यामध्ये कुटुंबातील माहेरवाशिणींना व ज्ञाती बांधवांनी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.या कार्यक्रमास आपण वस्तूरूप किंवा आर्थिक रुपाने सहकार्य करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क देवर्षि मित्र मंडळ, रत्नागिरी, श्री. कुलकर्णी (मोबा. ७७९८५४०६४७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.