के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात रंगले सांस्कृतिक कार्यक्रम

Google search engine
Google search engine

रत्नागिरी : लक्ष्मीचौक येथील कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाता प्रतिवर्षाप्रमाणे शालेय दिन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाविष्कार साकारला. विद्यार्थी मूकबधिर असले तरी त्यांना नृत्याचे सुरेख धडे देण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांनी सर्वांची वाहव्वा मिळवली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अॅड. सौ. विनया संकेत घाग, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सौ. सुमिता भावे, शाळा व्यवस्थापक पद्मश्री आठल्ये, मुख्याध्यापक गजानन रजपूत, पालक प्रतिनिधी उषा सुर्वे, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम पाहून अॅड. सौ. विनया घाग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शाळेला यथाशक्ती मदत करण्याची ग्वाही दिली.

सरस्वती वंदनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर ससा तो ससा, लल्लाटी भंडार, चौघडा तारा, कोळी गीत सादर झाले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या नृत्याविष्काराने सारेजण आनंदित झाले. त्यानंतर पालयिया छनकाये, बम बम बोले, चंद्रा, रंग लागला, आई तुझं देऊळ, झुमे रे गोरी, राजं आलं, अष्टमी या गीतांवर सुरेख नृत्य सादर केली. फॅन्सी ड्रेस व मिमिक्रीला उपस्थित प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.