मंडणगड | प्रतिनिधी : ऑनालाईन लॉटरीच्या नावाखाली शहरातील नाक्यानाकात मटक्याचे अड्डे सुरु झाल्याने जुगाराच्या विळख्यात गुरफटत चाललेल्या तालुकावासीयांची पोलीसांनी मुक्तता करावी अशी मागणी नागरीकांमधुन केली जात आहे. गेल्या काही महिन्यापांसून शहरातील नाकानाक्यात ऑनालाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली मटका या जुगाराचे व्यवसायाचे अड्डे सात ते आठ ठिकाणी राजरोसपणे चालविले जात आहेत. विशेष म्हणजे हा व्यवसाय करण्यासाठी खेड, माणगाव, मुंबई, पुणे, येथील मंडळी शहरात राजरोसपणे हे व्यवसाय स्थानिकांच्या मदतीने चालवत आहेत त्यामुळे युवावर्गामध्ये गुन्हागारीचे प्रमाण वाढण्याची भिती शहरात निर्माण झाली आहे. मटक्याचे जुगाराला आळा घालण्यासाठी पोलीसांनी उपाययोजना कारव्यात अशी मागणी जनतेमधून केली जात असून मटक्याचे व्यवसनापाई अनेक कुटुंबे देशोधडीला लागली असून. शहराती मटका व्यवसाय हळूहळू आजूबाजूच्या गावातील नात्यांपर्यंत पोहोचला आहे . लॉटरी सेंटरचा कायदेशीर पळ वाटेचा आधार घेऊन मटका चालविणारे पोलीसांच्या हातावर वेळोवेळी तुरी देत असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला पोलीसांनी याकडे गांर्भीयाने पाहण्याची मागणी होत असून स्थानीक पातळीवरुन कारवाई होत नसल्याने शहरातील नागरीक वरिष्ठ्य पोलीस यंत्रणेकडे या विषया संदर्भात तक्रार करण्याच पवित्र्यात असल्याची माहीतीही पुढे आली आहे.