वन्य पशु पक्षी हे आपले शत्रू नसून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे एक साधन

सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर

नेमळेत वन्य जीव सप्ताह जनजागृती कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :
वन्य जीवामध्ये पशु पक्षी यांचे जतन, संवर्धन केले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे कार्य् आपल्या हातून घडणार आहे. वन्य पशु पक्षी हे आपले शत्रू नसून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे ते एक साधन आहे आपण ज्याप्रमाणे एक मेकांवर अवलंबून असतो तसेच पशु पक्षीही एकमेकांवर अवलंबून असतात. या प्राण्यांच्या जतनासाठी वन्य जीव सप्ताहाची सुरुवात १९५२ सालापासून भारत देशामध्ये सुरुवात केली गेली. या पार्श्वभूमीवर सर्वांनी वन्यजीवांचे रक्षण करावे, असे आवाहन सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी केले.
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शुक्रवारी वन्य जीव सप्ताह, वन्य जीवांविषयी असलेले समज गैरसमज याबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यानी शाळेतील मुलाना वन्य जीव सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले.
वन्य जीवाचे महत्त्व मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे वनाविषयी व प्राण्याविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन वन्य जीव सप्ताह अंतर्गत सावंतवाडी वनविभाग यांच्या वतीने १ ते ७ आॕक्टोबर या कालावधीत ठिकठिकाणी वन्य जीव सप्ताह जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

यावेळी त्यांनी विषारी बिनविषारी सापाविषयी समज गैरसमज वन्य पशुपक्ष्याविषयी मुलांना मार्गदर्शन केले किटक ,पक्षी वन्य जीव याच्या अधिक संख्येमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो वन्य जीव जीवंत असताना मानवाला उपयोगी तसेच मृत्यूनंतर खत मिळते गरजा मर्यादित ठेवण्यासाठी वृक्षतोड थांबविणे आवश्यक आहे परिसंस्था टिकविणे हे आपल्या हातात आहे यावेळी त्यांनी गिधाडासारख्या दुर्मिळ पशु पक्ष्यांचा नाश कोणत्या औषधामुळे झाला ह्याविषयी मुलांना पटवून सांगितले.
यावेळी नेमळे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका कल्पना बोवलेकर ,शिक्षक राजेश गुडेकर उमेश राऊळ ,सी.टी.बंगाळ,नेत्रा चव्हाण ,दीप्ती सावंत प्राची ठाकूर, अनिल कांबळे सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर वनविभाग कर्मचारी मळगाव वनपाल प्रमोद राणे,नेमळे वनरक्षक रमेश पाटील ,बबन रेडकर,प्रकाश रणगिरे,वैशाली वाघमारे,अमृता पाटील ,गोपाळ सावंत तसेच ७ वी ते ११वीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अनिल काबळे यांनी मानले.