नासा व इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा लांजा तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार. ‌‌. ‌.

लांजा | प्रतिनिधी : लांजा तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने नासा व इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या तालुक्यातील तीनही विद्यार्थ्यांचा शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला. लांजा तालुक्यात या परीक्षेत प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेला शिरवली शाळेचा विद्यार्थी कु.आशिष गोबरे हा केरळ येथील इस्रो या संस्थेला भेट देण्यासोबतच अमेरिकेतील नासा या संस्थेला भेट देण्यासाठी जाणार आहे. लांजा तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने आशिषचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्याला या मोठ्या प्रवासाच्या पुर्वतयारीसाठी रक्कम रूपये 3000/- तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. ‌. ‌.

त्याचबरोबर वनगुळे नं – 1 शाळेतील कु.आर्यन गुरव या विद्यार्थ्यांने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी जाणार आहे, त्याबद्दल त्याचा पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी आर्यनला 1500/-रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याचसोबत लांजा नं -5 शाळेची विद्यार्थीनी कु.वेदांगी वारंगे हिने तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे तिला सुद्धा इस्रो या संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली आहे याबद्दल तिचाही पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी तिला रोख रक्कम 1500/- व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या तीनही विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ‌. तालुक्यातील या तीनही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर, तालुकाध्यक्ष संजय डांगे, जिल्हा कोषाध्यक्ष संजय विश्वासराव सचिव भागवत कुंभार, कार्याध्यक्ष विश्वनाथ सुर्वे, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव,अमित गराडे, शशिकांत बंडबे, रंगनाथ सरपोतदार, दयानंद लाखण, रामचंद्र तुळसणकर,वसंत शिंदे,विजय विश्वासराव, रविंद्र निवळे, संदीप घोरपडे,भागवत ठणके आदी पदाधिकारी उपस्थित होते.