मडगाव- नागपूर स्पेशल ट्रेनला शेगांव स्टेशनला थांबा मंजूर

Google search engine
Google search engine

कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांच्या मागणीला यश

रत्नागिरी: जम्मू काश्मीर येथे 6 नोव्हेंबर 2022 रोजी केआरयुसीसीच्या झालेल्या बैठकीत मडगाव- नागपूर ही गाडी आता कायमस्वरूपी आठवड्यातुन दोनदा धावत असून या मार्गावरील शेगांव या ठिकाणी या ट्रेनला थांबा मिळावा अशी मागणी भाजपा सरचिटणीस व कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी केली होती.या मागणीला प्रतिसाद देत प्रशासनाने दर बुधवार व शनिवार संध्याकाळी नागपूर ते मडगाव तसेच गुरूवार व रविवार रात्री मडगाव ते नागपूर एक्सप्रेसला शेगाव स्टेशनला थांबण्याची मंजुरी दिली आहे.

भाजपा सरचिटणीस व कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी प्रशासनाला विशेष धन्यवाद दिले आहेत.ते पुढे म्हणाले की,विदर्भ मधील अनेक संघटना तसेच रत्नागिरीतील श्री गजानन महाराज यांच्या भक्त गणांनी ही मागणी केली होती,ही मागणी पूर्ण झाल्यामुळे रत्नागिरीतील भक्तगण व इतर प्रवाशी याना नक्कीच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या ट्रेन ची तिकिटे उपलब्ध असून रत्नागिरीतील प्रवाश्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही वहाळकर यांनी केले आहे.भक्तगणाची होणारी गैरसोय रेल्वे प्रशासनाने दूर केल्याबद्दल पुन्हा विशेष आभार मानले.