गुहागर | प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने कारूळ येथील श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान नुकतेच पार पडले. यावेळी गुहागर तालुक्यातील खरेकोंड स्टॉप ते खरेकोंड फाटा या मार्गाची स्वच्छता करण्यात आली.दरवर्षी पावसाळा संपला की डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जाते.सार्वजनिक ठिकाणे यावेळी स्वच्छ केली जातात.याच अनुषंगाने कारूळ येथील श्री सदस्यांनी एकत्र येत खरेकोंड स्टॉप ते खरेकोंड फाटा या मार्गाची स्वच्छता केली.यावेळी येथील परिसरातील श्री सदस्य उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.