केंद्रशाळा झरेवाडी येथे साजरा झाला ‘एक गाव एक शाळा’ अविस्मरणीय उत्सव

Google search engine
Google search engine

रत्नागिरी | प्रतिनिधी : जिल्हा परिषद केंद्रशाळा झरेवाडी या शाळेला सप्टेंबर 2022 रोजी 75 वर्षे पूर्ण झाली.साधारणता 164 पट आणि 8 शिक्षक असं समाधानकारक चित्र असणारी ही जिल्हा परिषदेची मराठी शाळा. ग्रामस्थानी एक गाव एक शाळा हे सूत्र ठेवल्याने शाळेचा पट अजूनही समाधानकारक आहे.या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा 26 आणि 27 डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात पार पडला.आजी माजी विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक यांच्या सर्वांच्या मेहनतीने आणि अमृत महोत्सव समितीच्या उत्तम नियोजनामुळे डोळ्याचे पारणे फेडून टाकणारा असा सोहळा संपन्न झाला.
झरेवाडी गाव हा एकजूट आणि एकोप्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.त्यांच्या मनात ग्रामदेवतेएवढेच स्थान शाळेचे आहे.त्यामुळे गावच्या देवळात जसा उत्सव होतो तसाच हा अमृत महोत्सव इथल्या मंडळींनी पार पाडला. पहिल्या दिवशी अमृत महोत्सवाची सुरुवात झाली ती आजी माजी विदयार्थी ग्रामस्थ शिक्षक यांनी एकत्रित मिळून दिमाखादार आणि देखण्या अशा अमृत महोत्सवी प्रभात फेरीने.

यात लक्ष वेधून घेत होत्या त्या ढोल पथकातील विशिष्ट पारंपरिक पेहराव केलेल्या गावातीलच महिला.सोबत लेझीम खेळणाऱ्या गावातील महिला. शाळेतील विद्यार्थी देखील विविध वेशभूषेमध्ये आले होते.माजी विद्यार्थ्यांचा उत्साह तर शिगेला पोहोचला होता.संपूर्ण गावातून ही प्रभातफेरी काढली गेली.विशेष करून गावात ज्या ठिकाणी शाळेची सुरुवात झाली,त्या ठिकाणी म्हणजे गावाच्या पाऱ्या जवळदेखील प्रभात फेरी नेली गेली. नंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शाळेसाठी झालेल्या कामाच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला.शाळेचे जि.प.माजी अध्यक्ष उदय बने,माजी समाजकल्याण सभापती जि.प.रत्नागिरी परशुराम कदम,गावप्रमुख व अमृत महोत्सव समिती अध्यक्ष राजेश कळंबटे, गटविकास अधिकारी जे.पी.जाधव उपशिक्षणाधिकारी प्राथमिक सुधाकर मुरकुटे , विस्तार अधिकारी डॉ. सोपनूर, विस्तार अधिकारी सुनिल पाटील,विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे,सरपंच ऋतुजा गोताड,हातखंबा हायस्कुल माजी मुख्याध्यापक पठाण सर,माजी प्राचार्य प्रताप सावंतदेसाई,लांजा हायस्कुल माजी मुख्याध्यापक रमाकांत सावंत प्राध्यापक चंद्रमोहन देसाई,माजी केंद्रप्रमुख विनायक हातखंबकर अमृत महोत्सव त्याचबरोबर
गावातील प्रमुख मानकरी,सनगरेवाडी प्रमुख शांताराम सनगरे, माजी सरपंच चंद्रकांत गोताड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद गोताड,उपाध्यक्ष रिया सनगरे,माता पालक संघ उपाध्यक्षा निर्जरा गोताड, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष संदीप कळंबटे, शाळा व्यवस्थापन माजी अध्यक्ष संतोष सनगरे,माजी उपाध्यक्ष नरेंद्र गोताड,ग्रामपंचायत सदस्य दिनेश तांबे,नेहा कळंबटे,शाळेच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी,गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी,आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार लोखंडी गेट,ध्वजस्तंभ आदी कामाचा शाळार्पण सोहळा संपन्न झाला.सर्व मान्यवरांच्या स्वागतासह विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा गावातील तसेच शाळेच्या माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश गोसावी लिखित आणि दिग्दर्शित ‘मयुरी ‘या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.दुपारी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.तर संध्याकाळ सत्रात माजी विद्यार्थी मनोगत आणि चर्चा सत्र छान रंगले.तर रात्री गावातील बुजुर्ग माजी विद्यार्थी यांच्या आठवणीवर आधारित ‘आठवणीतली शाळा पाऱ्यावरची!’ ही चित्रफित दाखवली गेली.सदर चित्रफित शाळेतील पदवीधर शिक्षक राजेश गोसावी यांनी तयार केली.तर माजी विद्यार्थी गिरीश शितप यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.पहिल्या दिवसाची समाप्ती शाळेतील मुलांच्या अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमानी झाली.दुसरा दिवस सकाळी सत्यनारायण पूजा,नेहरू युवा संस्कार मंडळ झरेवाडीच्या माध्यमातून 75 वर्षे 75 रक्तदाते अशी संकल्पना घेऊन रक्तदान शिबीर पार पडले.दुपारी पुन्हा सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.2 दिवसात साधारणपणे 4 एक हजार लोकांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.दुपारी हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला.तर रात्री लांजा गटविकास अधिकारी तथा संस्कृती फाउंडेशन लांजा उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे,संस्कृती संघटक प्रियवंदा जेधे,सचिव विनोद बेनकर,स्पर्धाप्रमुख राहुल तोडकरी,सदस्य अभय पाध्ये,मंदार जाधव, चिंद्रवली सरपंच तथा शाळेच्या माजी विद्यार्थिनी जोशी यांनी विशेष हजेरी लावली. पुन्हा या उपक्रमाच्या निमित्ताने शाळेसाठी आर्थिक वस्तुरूप आणि मेहनतीच्या स्वरूपात योगदान देणाऱ्या सर्वच लोकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उद्योजक अण्णा सामंत, माजी आमदार बाळ माने,माजी अर्थ व बांधकाम सभापती बाबू म्हाप,महेंद्र झापडेकर,संज्योग दळी, हॉटेल अलंकारचे अप्पा देसाई,सरपंच ऋतुजा गोताड,उपसरपंच देवेंद्र सनगरे,गावप्रमुख राजेश कळंबटे, सर्व मानकरी,तंटामुक्ती अध्यक्ष मोहन कळंबटे,सोसायटी चेअरमन वसंत कळंबटे,कापडगाव सरपंच कोत्रे लायन्स क्लब हातखंबा रॉयल अध्यक्ष संतोष गुरव,शिक्षक नेते मनोज खानविलकर पोलीस पाटील बाळकृष्ण गोताड आदी मान्यवर उपस्थित होते.या महोत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ 15 लाखापेक्षा जास्त शैक्षणिक उठव झाला.हे सर्व श्रेय ग्रामस्थ पालक यांचे आहे.या निमित्तानेमाजी विद्यार्थी यांच्यामार्फत केली गेलेली कामे खालील प्रमाणे
मुख्य प्रवेशद्वारकमानी, ध्वजस्तंभ नूतनीकरण आणि सुशोभीकरण, प्रवेशद्वारासाठी लोखंडी गेट,शाळा प्रवेश रॅम्प सुशोभीकरण,शाळा उपयोगी विविध वस्तूंची भेटगावातून जमा झालेल्या निधी, मंडळाकडून आलेला निधी, वैयक्तिक देणगीदार यांच्या माध्यमातून झालेली कामे शाळेची रंगरंगोटी आणि दुरुस्ती, शाळेच्या भिंती बोलक्या करणे, पटांगणाचे चिरेबंदी लादी काम,शाळेचा मुख्य नाम फलक,शाळेतील इलेक्ट्रिक लाईट दुरुस्ती आणनूतनीकरण,कपाटे,टेबल,डायस,पूजा साहित्य,विविध पुस्तके,वर्गखोल्या नेमप्लेट,क्रीडा,कला,विज्ञान साहित्यशैक्षणिक साहित्याची देणगी शाळेला मिळाली.दुसया दिवशी सादर झालेले माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांच्याच लक्षात राहिले.

विशेष म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्ती या सोहळ्यात सामील झाला.या सर्वांचे श्रेय ग्रामस्थ पालक शिक्षक यांना तर आहेच त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या अमृत महोत्सव समिती अध्यक्ष राजेश कळंबटे,उपाध्यक्ष संतोष सनगरे,खजिनदार चंद्रकांत गोताड,सचिव गिरीश शितप,सदस्य ऋतजा गोताड सरपंच,अंनत गोताड,अरुण कळंबटे,काशिनाथ कळंबटे,मोहन गोताड मुंबई मंडळ अध्यक्ष,हेमंत जाधव,शांताराम सनगरे,अवधूत कळंबटे,औदुंबर कळंबटे,मुख्याध्यापिका आशा बगाडे,पदवीधर शिक्षक राजेश गोसावी यांच्यासह,शालेय व्यवस्थापन समिती,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ शाळेतील शिक्षक जीविता दळी,शुभांगी चव्हाण,सरिता आलीम,शीतल केळकर,रामनाथ बने,सुरेंद्र जाधव गावातील सर्व माजी विद्यार्थी यांच्या मेहनतीचे फळ आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश शितप,अवधूत कळंबटे आणि राजेश गोसावी यांनी केले.