विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचा तालुकास्तरीय निकाल जाहीर

रत्नागिरी : जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचा तालुकास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावर्षी विज्ञान शिक्षक मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून गेली अनेक वर्ष या विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात व तीन भाषेत आयोजन करण्यात येते. विज्ञान रंजन स्पर्धेसाठी विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचा तालुकानिहाय अनुक्रमे निकाल

मंडणगड- प्राथमिक गट- रिया संतोष जंगम, गौरी अमोल दळवी, कैवल्य प्रशांत जोशी. माध्यमिक गट- प्राची प्रविण कदम, सोनल संतोष गमरे, रैना इस्माईल हमदुले.

दापोली- प्राथमिक गट- यश मधुकर खाडे, संस्कृती सुभाष बुध, सार्थक शिवाजी पाटील, सोहम सुरेंद्र पाटील, अर्श इम्रान लोरे. माध्यमिक गट- सानिका भरत कावणकर, निवेदिता चंद्रकांत बेंडल, पायल शशिकांत वनगुले, महमद युनूस साहेबवाले, निनाद राजेंद्र पेवेकर.

खेड- प्राथमिक गट – श्रेया तुकाराम राणे, सुयश समीर चांदिवडे, रुचा विश्वजित मोहिते, समृद्धी विजय चव्हाण, श्रद्धा अनिल धुमक. माध्यमिक गट- जयराज विजय देसाई, श्रावणी प्रदीप जुवळे, सुजल सुरेश शिंदे, महमद अनस रिजवान तांबे.

चिपळूण- प्राथमिक गट- स्वरा महेश खातू, अस्मि अरविंद जोशी, स्वप्नाली नवनाथ पाटील, श्लोक एकनाथ गावडे, स्वरांगी प्रमोद जोशी. माध्यमिक गट- आफिया असिफ इनामदार, किरण किशोर शिंदे, जानवी अनंत कानापडे, प्राची राजेंद्र दळवी

गुहागर- प्राथमिक गट- आर्या मंदार गोयथळे, अनुष्का अतुल जाधव, संस्कृती दिनेश पाते, समृद्धी सुरेश आंबेकर. माध्यमिक गट – अफिन आदिल वणू, बशिरा महम्मद सिद्धीक घारे, पायल मंगेश गमरे

संगमेश्वर- प्राथमिक गट – मिहिर उदय भाट्ये, आसिया रफीफ शेख, निधी प्रकाश महाडिक, राजनंदनी कृष्णात जाधव, शिफा रफिक मेमन. माध्यमिक गट- कुणाल अनिल पेंढारी, सुशांत सुधीर माने, रियाज जलील मुल्ला, सलमान एस.मिरकर, संस्कार सुबोध चव्हाण.

रत्नागिरी – प्राथमिक गट – स्वराली अनिल माईण, साक्षी संजय आग्रे, गौरी अशोक बांदेकर, पार्थ धनंजय सरफरे, आर्य धनंजय दांडेकर, नईन तवक्वल वस्ता. माध्यमिक गट- अली मुबारक फणसोपकर, सायली संतोष पाचकुडे, मारिया बशिर कोल्हार, श्रेया रमेश शिलकर, सानिका जगदिश धाडवे.

लांजा – प्राथमिक गट- आर्शिया जावेद शेख, वेदांत दिनेश गावडे, आदिती अमोल जाधव, अनुष्का विवेकानंद नाईक. माध्यमिक गट -सानिका महेंद्र आग्रे, अलिशा वसीम तांबोळी, सिमरन विश्वास मांडवकर.

राजापूर- प्राथमिक गट – रुशदा सर्फराज हुसैनी, हबिबा मिरअली मौला, गौरव शरद चव्हाण, आयुष संदिप कुंभार, सिद्धेश ज्ञानेश्वर शिंदे. माध्यमिक गट- मंनतशा फरहान कुडाळकर, श्रेयस शांताराम पळसणकर, मानसी सागर पवार, साक्षी दीपक खांबल, अजिंक्य अशोक चव्हाण यांनी सुयश मिळविले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विज्ञान मंडळ जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, मोहन पाटील, सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तालुकास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जिल्हास्तरावर शनिवार दि. ०७ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत रा.गो.जागुष्टे हायस्कूल कुवारबाव येथे ( रत्नागिरी, लांजा ,राजापूर संगमेश्वर), युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण ( मंडणगड, दापोली,खेड , चिपळूण, गुहागर) निवड होणार आहे यातून दोन्ही गटात पाच क्रमांक काढले जाणार आहेत असे जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.