कणकवली पर्यटन महोत्सव कार्यक्रम स्थळी कामाचा शुभारंभ.!

Google search engine
Google search engine

नवीन वर्षाच्या सुरुवातीला कणकवली वासीयांना नव्या वर्षात वेगळी मज्जा लुटता येणार ; ५ ते ८ जानेवारी पर्यंत चालणार पर्यटन महोत्सव

कणकवली : कणकवली नगरपंचायत च्या पर्यटन महोत्सव २०२३ च्या महोत्सव स्थळाच्या ठिकाणी व्यासपीठ उभारणीसह अन्य कामाचा शुभारंभ कणकवली – परबवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परब यांच्या हस्ते करण्यात आला.

कणकवली नगरपंचायत चा पर्यटन महोत्सव ५ जानेवारी ते ८ जानेवारी पर्यंत चालणार असून, या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातले नामवंत कलाकार यांच्या सह स्थानिक कलाकारांचा देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या पर्यटन महोत्सवाकरिता भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सह राज्यातील भाजपा चे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रम स्थळी भव्य व्यासपीठ उभारले जाणार असून, या सर्वच कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, अण्णा कोदे, पप्पू पुजारे, लक्ष्मण घाडीगावकर, पंकज पेडणेकर, अजय घाडी, गौरव नेमळेकर आदी उपस्थित होते.