नासा आणि इस्त्रो भेटीसाठी निवड झालेल्या तीनही विद्यार्थ्यांचा गौरव

शहरातील त्रिमूर्ती फूड सेंटरच्या वतीने उपक्रम

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून झाला कार्यक्रम

लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये प्रमुख उपस्थिती

तीनही विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन करण्यात आला गौरव

लांजा | प्रतिनिधी : नासा आणि इस्त्रो भेटीसाठी निवड झालेल्या लांजा तालुक्यातील शिरवली, वनगुळे आणि लांजा नंबर ५ या शाळेतील तीनही विद्यार्थ्यांचा येथील त्रिमूर्ती फूड सेंटरच्या मालक वैदेही वळंजू यांच्या वतीने गौरव करण्यात आला.
नासा आणि इस्त्रो भेटीसाठी शिरवली शाळेचा आशिष गोबरे ,वनगुळे शाळा नंबर एकचा आर्यन गुरव आणि लांजा शाळा नंबर ५ ची वेदांगी वारंगे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या तीनही विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना अशाच प्रकारे यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्रिमूर्ती फूड सेंटर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये होते .यावेळी त्रिमूर्ती फुडच्या मालक वैदेही वळंजू यांच्या वतीने तीनही विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी लांजा शाळा नंबर पाचच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण, शिक्षिका माणिक कदम, वनगुळे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय लाखण, तसेच सहकारी शिक्षक विलास गोरे ,बाबू नागरगोजे, आणि शिरवली शाळेचे शिक्षक उमेश केसरकर तसेच लांजा येथील शिक्षणप्रेमी विनोद बेनकर, नंदकुमार सुर्वे आदी उपस्थित होते.