कार्यकाळात विकास कामांनी गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न — , नुतन सरपंच- ऋतुराज तेंडुलकर
कुमार नाडकर्णी | नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कणकवली तालुक्यातील कोंडये ग्रामपंचायतीवर सर्व आठ जागा भाजपने जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून माईणकर व पवार यांचे सह ग्रामसेवक सौ. नयना मिठबांवकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. आडवळणाच्या कोडये गावात अनेक प्रश्न, सुविधा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत. त्यामुळे माझ्या कार्यकाळात आमदार नितेशजी राणे आणि गावकऱ्यांच्या सहभागातून विकास कामांना प्राधान्य देऊन, गाव समृद्ध करण्यावर माझा भर राहील. त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नवनिर्वाचित सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांनी कार्यभार स्वीकारताना व्यक्त केले. उपसरपंचपदी रवींद्र तेली तर सदस्य म्हणून सुहास बिरजे, कमलेश तिरोडकर क्षितिजा तांबे, स्वप्नाली सावंत, अनिता गावकर, रिया तिरोडकर यांनी पदभार स्वीकारला.यावेळी कोडये गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सावंत, सोसायटीचे चेअरमन अण्णा तेंडुलकर यांचेसह गावातील युवाई आणि अबाल वृद्ध गावकरी- महिला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंचासह सर्व उमेदवार युवा असल्याने गावचा कारभार पारदर्शक आणि सक्षमपणे होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त होत होता…