तर उपाध्यक्षपदी वसंतराव घुईखेडकर यांची निवड
मुंबई । प्रतिनिधी :
सहकारी बँकांची देशातील सर्व प्रथम शिखर संस्था अशी ओळख असलेल्या दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबईच्या अध्यक्षपदी मा. श्री. विश्वास जयदेव ठाकूर तर उपाध्यक्षपदी मा. श्री. वसंतराव विश्वासराव घुईखेडकर यांची एकमताने निवड झाली, नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरी सहकारी बँकांमधून १५ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून संचालक महाराष्ट्रातील सहकारी बँकांनी नामनिर्देशित केलेल्या मतदारांनी निवडले होते.
याद्वारे नाशिक येथील विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मा. श्री. विश्वास जयदेव ठाकूर यांची अध्यक्षपदी तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री वसंतराव विश्वासराव घुईखेडकर यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
गेली ८३ वर्षे राज्यातील संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्राची म्हणजेच नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनमध्ये २१ संचालकांपैकी ९ संचालक बिनविरोध निवडून आले होते.
तर उर्वरीत संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ संचालक २०२२-२३ ते २०२६ -२७ या पाच वर्षाच्या कालावधीकरीता निवडून आले, अशी माहिती दि महाराष्ट्र राज्य सहकारी टॅक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्वाती पांडे यांनी दिली.
Sindhudurg