जलजीवन मिशन अंतर्गत कुंभाली विहीरीचे भूमीपूजन

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : जलजीवन मिशन अंतर्गत कुंभार्ली मळगाव येथील विहीर व नळ पाणी योजनेचे भूमीपूजन मळगाव सरपंच स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मळगांव दोन पूर्वस मंदिर लगत ही विहीर मंजूर करण्यात आली असून यासाठी सुमारे १ कोटी निधी उपलब्ध झाला आहे.

या भूमीपूजन प्रसंगी माजी सभापती राजू परब, ग्रामपंचायत सदस्य निकिता राऊळ, अनुजा खडपकर, रामचंद्र सावळ, आनंद देवळी, ग्रामपंचायतचे माजी सदस्य गुरुनाथ गांवकर, गजानन सातार्डेकर, पुरोहित विजय जोशी, दीपक जोशी, विश्वनाथ गोसावी, उदय सावळ, प्रसाद नाईक, सिद्धेश तेंडुलकर, बाबा ऍंथोन, पांडुरंग राऊळ, दीपेश राऊळ, शशिकांत राऊळ, बाबी राऊळ आदी उपस्थित होते.

Sindhudurg