ग्रामीण बोलीतील नाटक भावले
भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांची प्रमुख उपस्थिती
गुहागर (प्रतिनिधी):ग्रामीण बोलीतील आणि ग्रामीण भागातील कलाकारांच्या अप्रतिम कलेतून साकारलेल्या मुंबईमधील दादर येथील शिवाजीनाट्यगृहात पार पडलेल्या कन्यादान या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडी येथील नवोदित लेखक व दिग्दर्शक अमित पोफळे यांच्या ग्रामीण मातीतील वर्तमानकाळातील वास्तव दाखवणाऱ्या कन्यादान या नाट्यकलाकृतीने हसू आणि आसू चे हुबेहूब वास्तव रसिक प्रेक्षकांना दाखवून दिले आहे.यातील ग्रामीण कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम भूमिकांना सर्वांनीच डोक्यावर घेतले.

श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धारसाठी आयोजित करण्यात आलेल्या व सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली प्रस्तुत या नाट्यप्रयोगाला सामाजिक कार्यकर्ते व भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर,लालबागचा राजा ट्रस्टचे प्रशांत केळस्कर,,चला हवा येऊ द्या फेम अनंत ठीक,सोन्या चांदीचे प्रसिध्द व्यापारी सुहास मुसळूणकर,सामाजिक कार्यकर्ते मनोज डाफळे, सोमनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कारेकर,प्रसिध्द डॉक्टर भावना त्रिवेदि,प्रसिद्ध वकील संदीप आग्रे,नाट्यलेखक यशवंत माणके,संकेत बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तकुमार शिगवण यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुकाई देवी उज्ज्वल नाट्य मंडळ भेळेवाडी, श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच, श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ तळवली यांनी विशेष मेहनत घेतली.













