संगमेश्वरात मंगळवारी ‘अजित पवारांना साक्षर करा’ आंदोलन

Google search engine
Google search engine

भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार राहणार उपस्थित

रत्नागिरी | प्रतिनिधी : धर्मवीर’ छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीतच तर फक्त स्वराज्य रक्षक आहेत म्हणणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात रत्नागिरीकर आक्रमक झाले असून मंगळवार दि. ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता कसबा, तालुका संगमेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वात ”अजित पवारांना साक्षर करा आंदोलन” करण्यात येणार आहे

महाराष्ट्रातल्या इतिहास पुरुषांबद्दल वारंवार नींदाव्यंजक अथवा खालच्या दर्जाच्या विधानांनी जनसामान्यांची मने कायम दुखावणारे हे भ्रष्टमती! हिंदू धर्मद्वेष्ट्या, क्रूरकर्मा, कपटी, नीच औरंगजेबाला सूफी संत म्हणवणाऱ्यांची ही जमात ! त्या औरंग्यासमोर ४० दिवस देह सोलला जाऊन, डोळे फोडून घेऊनही स्वधर्म, स्वराज्य यांचा त्याग न करणारे ‘धर्मवीर’ छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीतच तर फक्त स्वराज्य रक्षक आहेत म्हणणाऱ्या अजित पवार यांची मती ताळ्यावर आणण्यासाठी मंगळवार दि. ३/१/२०२३ रोजी, सकाळी १० वाजता कसबा, तालुका संगमेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी हे आंदोलन होणार असल्याचे संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष, भाजपा दक्षिण रत्नागिरी दिपक पटवर्धन, जिल्हा कार्याध्यक्ष, भाजपा उत्तर रत्नागिरी केदार साठे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या भ्रष्टमतींना सदबुद्धी देण्यासाठी आता प्रत्यक्ष धर्मवीर संभाजी राजेंनाच साकडे घालण्याची वेळ आली आहे. कृपया सर्व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रमोद अधटराव यांनी केले आहे.