रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सौजन्याने नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यात येत आहे. त्याकरिता रोटरी क्लबच्या सदस्यांनी १ लाख ४० हजार रुपयांचा निधी रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांच्या सुपुर्द केला. पोलिओ निर्मूलन प्रकल्पासाठीही निधी वितरित केला.
एमआयडीसी येथे रोटरीचे ज्येष्ठ सदस्य कॅप्टन दिलीप भाटकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. या वेळी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांचा सत्कार कॅप्टन दिलीप भाटकर यांनी केला. सौ. देशपांडे यांचा सत्कार सौ. दीप्ती भाटकर यांनी केला. रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र घाग, सचिव रूपेश पेडणेकर, खजिनदार प्रकल्प आराध्ये, असिस्टंट गव्हर्नर नीलेश मुळ्ये, नमिता कीर, विनायक हातखंबकर, सचिन शिंदे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेला विभाग अद्ययावत करण्यासाठी, नवजात बालकांना जिल्हास्तरावरच सेवा व उपचार उपलब्ध होण्यासाठी अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे. यातून बालकांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणता येईल. या अतिदक्षता विभागासाठी रोटरी क्लबचे मंदार आचरेकर (पन्नास हजार रुपये), मिलिंद पावसकर (पन्नास हजार), मकरंद भुर्के (पंधरा हजार) प्रमोद कुलकर्णी (दहा हजार), स्वप्नील साळवी (दहा हजार), वैभव सावंत (पाच हजार) निधी दिला. तसेच समाजातील दानशूरांनी सढळहस्ते मदत करावी, असे आवाहनही केला. या कार्यक्रमात पोलिओ निर्मूलनासाठी रोहित विरकर आणि राजेंद्र घाग यांनी प्रत्येकी ८५०० रुपये दिले.
या कार्यक्रमात धीरज वेल्हाळ, मनीषा भागवत, मोहम्मद शेमले, वैभव सावंत, मुग्धा कुळये, मनिष नलावडे, केतन गांगण आणि केतन सावंत या नवीन सदस्यांचे स्वागत श्री. देशपांडे यांनी केले. याप्रसंगी माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. अलिमियॉं परकार, धरमसी चौहान, देवदत्त मुकादम, सौ. वेदा मुकादम, माधुरी कळंबटे, मुकेश गुप्ता, सौ. इंदुलकर, श्री. बेर्डे, अशोक घाटे, प्रसाद मोदी, विजय पवार, मंदार सावंतदेसाई, राहुल पंडित, माजी पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते