सावंतवाडी । प्रतिनिधी : क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व विभागीय क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेमध्ये मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचा विद्यार्थी कु. साहिश दिगंबर तळणकर याने १७ वर्षाखालील मुलांच्या गटात १० मीटर पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३७३ गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. डेरवण रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नेमबाजी स्पर्धक सहभागी झाले होते. या यशामुळे साहिश तळणकरची रायगड येथे होणार्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साहिलने मिळवलेल्या या यशाबद्दल मळगाव एक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूलचे संस्था अध्यक्ष शिवरामभाऊ मळगावकर, सचिव आर. आर.राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक फाले सर, पर्यवेक्षक कदम सर तसेच अन्य शिक्षक,शिक्षकेतरकर्मचारी ,पालक व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या.साहिशला सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री कांचन उपरकर व विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामध्ये शिक्षक व आई-वडिलांचाही सिंहाचा वाटा आहे.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी मळगाव हायस्कूलचा विद्यार्थी साहिश तळणकरची राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत निवड