रत्नागिरी Breaking : परटवणे येथे ट्रक दुचाकीचा भीषण अपघात; एक ठार

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील परटवणे येथे माशाच्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तरुण दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ट्रकचे चाकचं दुचाकी चालकाच्या अंगावरून गेले. हा युवक साखरतर येथील असल्याचे समजत असून तो रत्नागिरीहून साखरतरला जात असताना एम आय डी सी येथून भरधाव वेगाने आलेल्या मच्छीच्या ट्रकची जोरदार धडक दुचाकीला बसली.

या अपघातामुळे साखरतर येथील नागरिक आक्रमक झाले असून त्वरित कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.