रत्नागिरी | प्रतिनिधी : जन संघ ते भाजप असे सामाजिक काम करत रत्नागिरी पंचायत समिती सभापती , शेतकरी व मच्छिमार नेता म्हणून ओळख असणारे दिवंगत यशवंत माने यांचा आज स्मृतिदिन पुत्र बाळासाहेब माने व हेमंतराव माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ज्यांनी लहान पणीच समाजसेवेचे बाळ कडू आपल्या मुलाला दिलेले , व ज्यांच्या पुण्याई मुळे रत्नागिरी चे आमदार पद भूषविलेले माजी आमदार बाळासाहेब माने प्रती वर्षी आपले वडील दिवंगत यशवंत राव माने यांचा स्मृतिदिन साजरा करतात. आणि त्यांच्याच नावे सुरु केलेल्या ‘यश फाउंडेशन ‘ या संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम तर करतातच व यश फाउंडेशन या संस्थेची एक नर्सिंग कॉलेज , एक माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा देखील चालवतात.
वडील यशवंतराव माने यांची समाजामध्ये अखंड पणे आठवण राहावी व त्यांनी सुरु केलेले समाजसेवेचे व्रत अखंड पणे सुरु राहावे हा त्या मागील उद्देश , त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिक पणाच्या रस्त्यावर मी मार्गक्रमण करित असताना आई वडिलांचे आशीर्वादाची शिदोरी माझ्यासोबत आहे याचे समाधान वाटते तर कै. यशवंतराव माने, कै. शांताराम बापू केतकर, कै. जगन्नाथ शंकर केळकर, कै. तात्या नातू यांनी दिलेले विचारांचे बाळकडू घेऊन आपल्याला निष्ठेने भाजपचे काम करायचे आहे असे यावेळी बाळासाहेब माने यांनी सांगितले.