स्टार किंग निरवडे उप विजेता तर फ्रंटमॅन अभिषेक तेंडोलकर
सावंतवाडी । प्रतिनिधी : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मळगांव येथील भिल्लवाडी गृपच्यावतीने आयोजित भव्य खुल्या रस्सीखेच स्पर्धेत कलेश्वर वेत्ये संघाने विजेतेपद पटकावले. रोमहर्षक अंतिम सामन्यात स्टार किंग निरवडे संघावर मात करीत वेत्ये संघ विजेतेपदाचा मानकरी ठरला.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या स्पर्धेत सावंतवाडी, कुडाळ, कोल्हापूर, वेंगुर्लासह एकुण दहा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत कलेश्वर वेत्ये विरूद्ध स्टार किंग निरवडे यांच्यात अंतिम सामना रंगला. यात कलेश्वर वेत्ये संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावत प्रथम पारितोषिक २१ हजारांचे ते मानकरी ठरले. स्टार किंग निरवडे उप विजेता तर फ्रंटमॅन अभिषेक तेंडोलकर ( कलेश्वर वेत्ये), लास्ट मॅन राजा मांजरेकर ( स्टार किंग निरवडे) ठरले.