कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडीच्या वतीने राजापूर येथे 5 ते 7 जानेवारी या दरम्यान लांजा-राजापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Google search engine
Google search engine

 

राजापूर (वार्ताहर): राजापूर व लांजा तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शहरातील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी यांच्या वतीने दि. 5 ते 7 जानेवारी या दरम्यान आंबेवाडी येथे राजापूर व लांजा तालुकास्तरीय प्रकाश झोतातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रूपये 10 हजार 1, व उपविजेत्या संघाला रोख रूपये 7 हजार 1 व चषक देवून गौरविले जाणार आहे. याशिवाय वैयक्तीक पारितोषिक देवून गौरविले जाणार आहे.

तसेच तालुकास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 7 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. तर 5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळात रक्तदान शिबीराचेआयोजन करण्यात आले आहे.

कबड्डी स्पर्धा हनुमान मंदिर आंबेवाडीच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश बंडबे, सेक्रेटरी अविनाश लोळगे, उपाध्यक्ष महेश बंडबे यांनी केले आहे.