सिने अभिनेते गिरीष ओक, साहित्यीक अशोक बागवे यांची उपस्थीती
राजन लाड (जैतापूर): राजापूर तालुक्यातील माडबन येथील प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. या निमित्ताने माडबन येथे 4 आणि 5 जानेवारी 2023 रोजी शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माडबन हे गाव अगदी साता समुद्राच्या नकाशावरती प्रसिद्ध आहे. या गावाने या देशाला स्वातंत्र्य सैनिक, नाटककार, वकील, शिक्षक, मिलेक्ट्री मॅन पोलीस कर्मचारी तसेच राजकीय नेते दिले. या सर्वांनी आपल्या विद्यार्थी जीवनाची सुरुवात या शाळेतूनच केली. शंभर वर्षांपुर्वी कै.बाबाजी अनाजी तारकर यांनी विजयदुर्ग येथून येऊन माडबनच्या निसर्ग रम्य अशा सड्यावरती या शाळेची वास्तू उभी केली. या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, कवी आणि साहित्यिक अशोक बागवे, वेटलिफ्टर आणि स्ट्रॉंगेस्ट वूमन ऑफ अशिया अनुजा तेंडोलकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे . तर 96 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या जगप्रसिद्ध वस्त्रहरण या नाटकासह विठ्ठल विठ्ठल या नाटकाचे स्थानिक संचातील नाट्यप्रयोगही सादर होणार आहेत.
यानिमित्त 4 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता सत्यनारायणाची महापूजा, 9:30 वाजता वृक्षारोपण,10 वाजता उद्घाटन आणि सत्कार सोहळा ,दुपारी 1 ते 2: 30 भोजन, 3 ते 5 या वेळेत माडबन केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 8 वाजता श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळ जानशी निर्मित विठ्ठल या नाटकाचा 22 वा प्रयोग होणार आहे .
5 जानेवारी रोजी 10 वाजता माजी शिक्षक, माजी विद्यार्थीज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा. दुपारी 2:30 महिलांसाठी हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर सयांकाळी 4 वाजता माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर रात्री 8 वाजता जगप्रसिद्ध विश्वविक्रमी वस्त्रहरण या नाटकाचा स्थानिक कलाकारांच्या संचातील नाटकाचा प्रयोग होणार आहे.
या कार्यक्रमाला राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी, उपविभागीय अधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव, गटविकास अधिकारी सुहास पंडित, गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, सागरी पोलीस ठाणे नाटेचे सपोनि आबासाहेब पाटील आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन शतक महोत्सव कमिटी मुंबईचे अध्यक्ष शैलेश वाघधरे, सचिव अड. दत्तराज शिरवडकर, खजिनदार मनोज वाघधरे, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष श्यामसुंदर गवाणकर, खजिनदार संदीप कदम, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व ग्रामस्थ व पालकांनी आणि शतक महोत्सव कमिटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.