पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या करड्या नजरेखाली उमेदवारांच्या मैदानी चाचणी प्रारंभ
सिंधुनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग पोलीस भरतीसाठी सिंधु नगरी येथील पोलीस परेड गाऊन पुन्हा एकदा गजबजून गेले आहे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी प्रारंभ झाला आहे. सोमवारी बोलवण्यात आलेल्या 700 पैकी 467 उमेदवारांनी पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली आहे. 22 पोलीस चालक पदांची ही भरती होणार असून 2126 उमेदवारांनी या पदाच्या भरतीसाठी अर्ज दाखल केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल करड्या नजरेखाली ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती जिल्हा स्थानिक प्रमुख संदीप भोसले यांनी दिली.
22 वाहन चालक आणि 99 पोलीस अंमलदार यासाठी या पदांकरिता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात भरती होत आहे. वाहन चालक पदासाठी 2126 तर पोलिस अंमलदार पदासाठी 5986 असे एकूण 8084 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. सोमवारी पहिल्या दिवशी 700 उमेदवारांना बोलवण्यात आले होते त्यापैकी 467 उमेदवार हजर राहून मैदानी चाचणीत सहभागी झाले.