सावंतवाडी शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करावा

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील विकास कामांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी निवेदन सादर करीत निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.सावंतवाडी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, अग्निशमन केंद्र व रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यावधींच्या निधीची आवश्यकता असून ती पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सावंतवाडी शहर हे पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असून मध्यवर्ती शहर आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी कोट्यावधींच्या निधीची गरज आहे. सावंतवाडी नगरपरिषद हि ‘क’ वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषदेचा स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता दिलेली आहे. प्रकल्प अहवालात नमूद उपकरणे मशीन यंत्रे इत्यादीची खरेदी करुन नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी करावयाची कार्यवाही सुरु आहे.
सावंतवाडी नगरपरिषद ही क वर्ग नगरपरिषद असून नगरपरिषद क्षेत्रात अंदाजे प्रतिदिन ७ ते ८ टन ओला कचरा व ५ टन सुका कचरा निर्माण होत आहे. या निर्माण होणा-या कच-यावर प्रक्रीया करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने धनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कारीवडे येथे कचरा प्रक्रीया प्रकल्प उभारलेला असून या ठिकाणी कच-यांवर प्रक्रीया करण्यात येते.
सावंतवाडी नगरपरिषद सुक्या कचऱ्याचे किमान ३५ प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट व गांडूळ खत निर्मिती करण्यात येते तसंच याठिकाणी सांडपाणी प्रक्रीया FSTP प्रकल्प उभारलेला आहे. परंतु हा प्रकल्प अपूरा पडणारा आहे. तसेच सावंतवाडी नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये राज्यस्तरावर 07 वा क्रमांक प्राप्त केलेला असून याही पेक्षा प्रगतीने काम करून त्यामध्ये सातत्य राखणेसाठी सावंतवाडी नगरपरिषदेस खालील कामांसाठी निधीची अत्यंत आवश्यकता आहे.

सांडपाण्यावर प्रक्रीया करणेसाठी 50 KLD क्षमतेचा प्रक्रीया केंद्र उभारण्यासाठी 50 लक्ष, निंबाळकर पीर येथे सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी 25 kLD क्षमतेचा S.T.P. प्रक्रीया केंद्र उभारण्यासाठी 15 लक्ष, दर दिवशी 5 टन क्षमता C & D बेस्टवर प्रक्रिया करण्यासाठी पुनर्वापर केंद्र उभारण्यास 35 लक्ष व सुक्या कच-यापासून ब्रिकेट तयार करण्यासाठी डस्टर मशिन खरेदीसाठी 9 लक्ष अशी घनकचरा व्यवस्थापन करीता निधीची अत्यंत आवश्यकता असल्याने सावंतवाडी नगरपरिषदेस 1कोटी 9 लाख निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संजू परब यांनी केली.

तर, सावंतवाडी नगरपरिषद हि क वर्ग नगरपरिषद आहे. सावंतवाडी शहर हे पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असून सावंतवाडी शहरात दररोज अनेक पर्यटक येत असतात. सावंतवाडी शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तरी सावंतवाडी नगरपरिषदेने आरक्षण क्र. ४७ या जागेत अग्निशमन केंद्र बांधण्याचे नियोजित केलेले आहे. परंतु नगरपरिषदेकडे शासन निधी नसल्याने अद्यापर्यंत बांधकाम झालेले नाही. तरी आपल्या स्तरावर (जिल्हास्तर) जिल्हा नगरोत्थान अग्निसुरक्षा अभियानांतर्गत (सन २०२२-२३) मध्ये सावंतवाडी नगरपरिषद अग्निशमन केंद्र बांधणे व शहरातील विविध ठिकाणी रस्ते खराब झालेले असल्याने रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 630 लक्ष रूपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.