सावंतवाडी । प्रतिनिधी :
नववर्षाचे औचित्य साधून सावंतवाडी जिमखाना मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव तसेच अनेक खेळाडूंना प्रशिक्षित करुन नावारुपास आणलेले प्रशिक्षक दिनेश कुबडे यांनी समर्थ क्रिकेट अकादमि सुरु केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारी रोजी अकादमितील खेळाडू कु. ऋदुराज टेंबकर व कु. आर्यन पार्सेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अकादमीला सुरुवात केली.
या अकादमीतुन खेळाडूंना सर्वोच्च प्रशिक्षण देऊन जिल्हा राज्य तसेच देशासाठी क्रिकेटपटू घडविणे हा उद्देश ठेऊन खेऴाडूंना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यावेळी सौ. मुग्धा दिनेश कुबडे, माजी नगरसेवक देवा टेंबकर, ॲड. सिद्धार्थ भांबूरे, महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील संघाचा खेळाडू कु. प्रथमेश गावडे, प्रशिक्षक गोट्या कारिवडेकर, अरूण घाडी आदी उपस्थित होते.
या अकादमीचा जास्तीत जास्त मुला मुलींनी लाभ घेऊन आपला खेळ तसेच व्यक्तिमत्व विकास करावा असे आवाहन दिनेश कुबडे यांनी केले आहे.
Sindhudurg