दशावतारावरील एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभाग
सावंतवाडी । प्रतिनिधी : दशावतार लोककलेचे सादरीकरण करण्यासाठी डोंबिवली मुंबई उपनगर येथे झालेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत मळगाव हायस्कूलचा विद्यार्थी साई सुरेश तांबे याने सादर केलेल्या कलेबद्दल तेथील बावळाट ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने साई तांबेला गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीदेवी सातेरी माऊली दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून कोकणात लोकप्रिय असणारी दशावतार कला डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीत सादर करून भूषण व अशी कामगिरी केल्याबद्दल त्याचा हा गौरव करण्यात आला. यावेळी डोंबिवली बावळाट मंडळाचे अध्यक्ष किरण रघुनाथ परब, सचिव निवृत्ती परशुराम परब व खजिनदार बाबू गोविंद सावंत यांनी साईला सन्मानित केले.
साईने मिळवलेल्या या गौरवाबद्दल मळगाव एक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूलचे संस्था अध्यक्ष शिवरामभाऊ मळगावकर, सचिव आर. आर.राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक फाले सर, पर्यवेक्षक कदम सर तसेच अन्य शिक्षक,शिक्षकेतरकर्मचारी ,
पालक व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या.
साई हा मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचा सातवीतील विद्यार्थी असून त्याच्या या कलेत त्याचे वडील तथा दशावतार कलाकार सुरेश धोंडू तांबे यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे.
Sindhudurg