नुतन वर्षाच्या प्रारंभी तवसाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Google search engine
Google search engine

विनर्स परिवार कोल्हापूर आणि तवसाळ ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे विनर्स परिवार कोल्हापूर आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन वर्षाच्या प्रारंभी 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर 1 येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विनर्स परिवार कोल्हापूर यांचे सदस्य आणि नरवण गावचे सुपुत्र निवृत्त शासकीय अभियंता सुधीर वेल्हाळ, प्रियंका वेल्हाळ, राजेश्वरी वेल्हाळ, नम्रता माळवदे यांच्या माध्यमातून हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये कराडा स्कॅन मशीनद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी करून आपली उंची, वजन, शरीरातील चरबी, पाण्याचे प्रमाण,शारीरिक क्षमता याची योग्य माहीती देऊन शरीर निरोगी राहण्याकरता नियमित खाण्याबद्दलचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन तवसाळ महामाई – सोनसाखळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि खोत सन्मा. मोहन (बंधू) गडदे यांनी स्वतःची शारीरिक तपासणी करून केले. यावेळी तवसाळ ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, राजेश सुर्वे,उदेश शिरधनकर,मनोहर मयेकर,सुदेश सुर्वे, विलास सुर्वे, किसन पड्याळ,एकनाथ गडदे, शैलेश नार्वेकर शांताराम सुर्वे,मोरेश्वर गडदे, प्रकाश सुर्वे, प्राजक्ता सुर्वे, संगीता सुर्वे, प्रीती गडदे, प्रतीक्षा सुर्वे, लता सुर्वे, विनया सुर्वे, माजी पोलीस पाटील सत्यवान गडदे आधी सह बहुसंख्य ग्रामस्थ मान्यवर मंडळी उपस्थित होती. हे शिबिर आयोजित करण्यासाठी कातळे ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रियांका निलेश सुर्वे यांनी विशेष प्रयत्न केले होते तर शिबिर नियोजीत पद्धतीने पार पडण्यासाठी किरण गडदे, विवेक गडदे, सार्थक सुर्वे यांनी विशेष मेहनत घेतली.