अनिष्ट रुढी परंपरांना मुठमाती द्या–सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर

आचरा | अर्जुन बापर्डेकर : समाज व्यवस्था जातीव्यवस्थेतून निर्माण झालेली स्पृश्य अस्पृश्यता याचाच फायदा उठवत इंग्रजांनी भारतावर दिडशे वर्ष राज्य केले. या अनिष्ट प्रथांना भारताचे आधारस्तंभ या नात्याने विद्यार्थ्यांनी मुठमाती देण्याचे आवाहन नागरी हक्क संरक्षण विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी आचरा हायस्कूल येथे केले. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. मुलांनी प्रसिद्ध केलेल्या उगम अंकाचे डौर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलिमा सावंत, मुंबई समिती सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटी सदस्य राजन पांगे,बाबाजी भिसळे,अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, चरा पोलिसस्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बळिराम सुतार,पोलिस उपनिरिक्षक चव्हाण,वांयंगणी हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक पेडणेकर, सुरेश गावकर इंग्लिश मेडिअम स्कूल च्या प्रिन्सिपल मायलीन फर्नांडिस, मॅनेजमेंट स्कूलचे दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुरा माणगांवकर यांनी केले तर आभार गुटूकडे सर यांनी मानले. सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांच्या कलाविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.