कणकवली कोरल अपार्टमेंटचा स्नेहमेळावा उत्साहात
आचरा | अर्जुन बापर्डेकर : कोरल अपार्टमेंटच्या वार्षिक स्नेहमेळावा आणि सत्यनारायण पूजेनिमित्त आचरा येथील देवूळवाडी दिंडी मंडळाच्या पावला नृत्य आणि अपार्टमेंटच्या मुलांनी सादर केलेल्या कलाविष्काराने रंगत आणली.यावेळी सदिच्छा भेट दिलेल्या कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी या सोसायटीच्या रहिवाशांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक अभिजीत मुसळे, कोरल अपार्टमेंटचे दत्ता डेगवेकर,दत्ताराम जाधव उदय करंबेळकर, अर्जुन बापर्डेकर, रामकृष्ण शिरवलकर,राम घाडी, यश राणे, संदीप पाचकूडे, जयेश सावंत, विनायक चव्हाण,संतोष गुरसाळे, संदीप ताम्हणकर,प्रशांत राणे,,पूर्णान्ंद परब,बाळकृष्ण कुडतरकर, भालचंद्र घाडी, ,गणेश सावंत, अनिल बावकर,़इशा मुणगेकर, रमेश सावंत ,प्रकाश नाईक,पूजा कडकोळ ,दळवी यांच्या सह त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते. यावेळी आचरा देवूळवाडी येथील दिंडी नृत्याने या कार्यक्रमात रंगत आणली. तसेच सोसायटीच्या मुलांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.