वेंगुर्ले | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुका महिला मोर्चा तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान करणार्या विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा निषेध करून महिला मोर्चा तर्फे त्यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली.तसेच ‘धर्मासाठी झिजला छावा, औरंग्या चा जाणून कावा’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ , ‘महापुरुषांचा अपमान हेच पवारांचे अभियान ‘अजित पवारांचा धिक्कार असो’,अशा अजितदादा पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून महिला मोर्चा ने परीसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली, तालुका अध्यक्ष श्री सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा प्रभू खानोलकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ. स्मिता दामले, माजी पं. स. सभापती सौ. सारीका काळसेकर सरचिटणीस सौ.वृंदा गंवडळकर, शहर अध्यक्ष सौ प्रार्थना हळदणकर , सुजाता देसाईं, नगरसेविका शितल आंगचेकर,कृपा मोंडकर,वृंदा मोर्डेकर ,आकांक्षा परब,रसिका मठकर, सरपंच सौ.रिद्धी गावडे, सौ.प्राची नाईक, श्रीमती प्रणिती आंबडपालकर, शमिका बांदेकर, सौ नमिता नागोळकर,सौ. सीता शिरोडकर, सौ. कावेरी गावडे, सौ.रश्मी परब,, सौ . रूपाली नाईक,सौ. प्रिती गावडे, सौ .शामल केरकर,सौ .स्वरा देसाई, नेत्रा राणे,रती नाईक,राखी धुरी,अरूणा गवंडे, मानसी चव्हाण वगैरे सर्व महिला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होत्या
Home सिंधुदुर्ग वेंगुर्ले वेंगुर्ले येथे भाजप महिला मोर्चा तर्फे अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी..