जनता विद्यामंदिर त्रिंबक ने पटकवला तिसरा क्रमांक
आचरा | प्रतिनिधी : मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत सांगली, सातारा कोल्हापूर,सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे पाच जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते.तृतिय क्रमांकासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत लठत झाली यामध्ये जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थीनींनी २५-१८ अशी आखाडी घेऊन तिसरा क्रमांक पटकाविला त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अण्णा सकपाळ सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वारंग सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले