आचरा : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार ११ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार असून रात्री १० वाजता बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कवठी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंब वरचीवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे