सावंतवाडी । प्रतिनिधी : वक्तृत्व हि प्रयत्न साध्य कला आहे.ती प्रयत्नातुन साध्य करता येते.वक्तृत्व म्हणजे नेमके आणि प्रभावीपणे विचार व्यक्त करणे होय असे मत प्रा.वैभव खानोलकर यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग तुळस आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात व्यक्त केले.
प्रतिवर्षी प्रमाणे या हि वर्षी वेताळ प्रतिष्ठान तुळस यांच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे त्याच्यातील वक्ता घडावा या हेतुने ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अनेक शाळांचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन प्रा.वैभव खानोलकर यांना आयोजकांनी निमंत्रीत केले होते. प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासुन विविध वक्तृत्व स्पर्धा ,निंबध स्पर्धा ,कथाकथन स्पर्धा शोधनिंबध, काव्या स्पर्धा यात राज्यस्तरा पर्यंत बक्षिसे मिळवली असुन सध्या जिल्हा स्तरवर,राज्यस्तवर आणि विद्यापीठ स्तरावर ही होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेला ही ते तज्ञ परिक्षक म्हणुन काम करताना दिसतात.
प्रा.वैभव खानोलकर हे युवा व्याख्याते म्हणुनही महाराष्ट्र ,गोवा आदी भागातही विविध विषयावर व्याख्याते म्हणूनही प्रबोदन करतात.एक उत्तम मुलाखतकार म्हणुनही ते समाजात लोकप्रिय आहे तळकोकणातील दशावतार लोककलेचे ते अभ्यासक म्हणुन ही त्याचे दशावतार कला क्षेत्रात योगदान आहे. राज्यात होणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रमात अभ्यासपूर्ण निवेदनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रा.खानोलकर त्यांनी निवेदक म्हणुन ही आपली नवीन ओळख बनवली असुन विविध मान्यवरांनी त्याच्या निवेदनाची दखल घेतली आहे.सध्या नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात आणि न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले येथे ते अध्यापक म्हणुन कार्यरत आहे.आपल्या वक्तृत्व,निंबध लेखन आदी गुणांचा वसा आपल्या विद्यार्थ्यांना देणाऱ्या प्रा.खानोलकर यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर बक्षिसे प्राप्त आहेत.