आबलोली : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच वैष्णवी नेटके तर उपसरपंच अक्षय पागडे यांनी आपला पदभार मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यपदी प्रभाग एक मधून अक्षय यशवंत पागडे, शैला संतोष पालशेतकर, पायल प्रमोद गोणबरे, प्रभाग दोन मधून नम्रता जयंता निमूणकर, ऋषिकेश विलास बाईत, संजय सोनू कदम तर प्रभाग तीन मधून वृषाली विजय वैद्य, उमेश उदय पवार, रूपाली निलेश कदम हे निवडून आले आहेत. उपसरपंच निवड सरपंच वैष्णवी नेटके यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही.वेल्हाळ यांच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली. ग्रामसेवक बी.बी. सूर्यवंशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले तसेच गावातील ग्रामस्थांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावातील सर्व समाज घटकांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण प्रयत्नशील असू असे सरपंच- उपसरपंच यांनी सांगितले.