आमदार नितेश राणे यांनी घेतले कांदळगावचे ग्रामदैवत देव रामेश्वरचे दर्शन

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजप युवमोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यासह शिवराम परब, बाबाजी परब, उमेश कोदे, विशाल राणे, बापू गुरव, मंगेश गुरव, प्रसाद भोगले, शशिकांत परब, बाबी परब, शामा मुळये, शामा सावंत, भुषण सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य दत्तविहार कोदे, विरोधी पक्षनेते संतोष पारकर, सौ. शारदा मुळये, संजय परब यासह भाई मांजरेकर, रवी मालवणकर आदी उपस्थित होते.दरम्यान आमदार नितेश राणे लवकर मंत्री होऊदेत असे साकडे ग्रामस्थ, पुजारी यांच्या वतीने रामेश्वर चरणी घालण्यात आले