अस्मि प्रविण मांजरेकर पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : तालुका जिल्हा व राज्यस्तरीय वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेचे मैदान गाजवणारी आरपीडी हायस्कुल सावंतवाडीची विद्यार्थीनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेतही दबदबा राखला आहे. मंगळवारी रात्री उशिरा शासनाच्या संकेत स्थळावर गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये अस्मि मांजरेकर हिने २०२ गुण पटकाऊन गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. शिष्यवृत्ती चा राज्यात निकाल केवळ २२ टक्के लागला आहे जुलै २०२२ मध्ये ही परीक्षा झाली होती.
अस्मि ही सहावीत शिकत आहे. यापूर्वी ही तिने तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल अस्मिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकासभाई सावंत, स्कुल कमिटी चेअरमन डॉ. दिनेश नागवेकर, सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, मुख्यध्यापक जगदीश धोंड, उपमुख्याध्यापक श्री नाईक, पर्यवेक्षक साळगावकर, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.