आस्थाच्या पुढाकाराने सायली आणि अक्षय ला मिळाली डी मार्ट रत्नागिरी येथे नोकरी

Google search engine
Google search engine

आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी ही संस्था दिव्यांगांसाठी समर्पित आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आस्था सातत्याने प्रयत्न करत आहे. यातच दिव्यांगांना नोकरी व्यवसायासाठी मदत करणे हे देखील आस्था करत आहे. रत्नागिरी डी-मार्ट येथे मूकबधिर दिव्यांगांसाठी दोन जागा रिक्त आहेत अशी माहिती आस्थाला मिळाली व सदर जागा युथ फॉर जॉब च्या माध्यमातून भरल्या जाणार आहे हे देखील कळाले. त्यानंतर त्वरित आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे श्री.संकेत चाळके यांनी युथ फॉर जॉबच्या श्री. तुळशीराम जाधव सरांशी संपर्क केला. निकषात बसणाऱ्या सायली कुळये व अक्षय जाधव यांचे आवश्यक ते कागदपत्रे पाठवण्यात आले. युथ फॉर जॉब ने आस्थाच्या ऑफिस मधूनच दोन्ही मुलांची ऑनलाईन मुलाखत घेतली.त्या नंतर कोल्हापूर डीमार्ट येथे प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली . आणि अशा रीतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही कर्णबधिर दिव्यांग 1 डिसेंबर 2022 पासुन रत्नागिरी डीमार्ट येथे सेवेत रुजू झाले आहे.या दोन दिव्यांगांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी आस्था सोशल फाउंडेशन च्या श्री संकेत चाळके यांनी युथ फॉर जॉब च्या सहकार्याने विशेष प्रयत्न केले.